IND Vs NZ | विल्यमसननंतर न्यूझीलंडचा ‘हा’ खेळाडू टी- 20 सीरीजमधून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND Vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी20 आणि 2 टेस्ट मॅचच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मॅचच्या सीरिजमधील (T – 20 Series) पहिला सामना जयपूरच्या (Jaipur) सवाई मानसिंग स्टेडियममध्ये (Sawai Mansingh Stadium) खेळवण्यात येणार आहे. यादरम्यान न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केन विल्यमसननंतर (Ken Williamson) न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने (Kyle Jamieson) टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या टी20 सीरीजमधून (IND Vs NZ) बाहेर होण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिसनला कसोटी फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रित करायचे आहे आणि त्यामुळेच त्याने टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर (IND Vs NZ) दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 25 नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (World Test Championship) भाग आहे.

 

न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stade) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की हे दोन्ही खेळाडू टी-20 मालिका खेळणार नाही. कसोटी मालिकेसाठी हे दोघेही संघासाठी उपलब्ध असणार आहेत. न्यूझीलंड हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला विजेता आहे. त्याने यावर्षी जूनमध्ये भारताचा पराभव करून का ‘किताब जिंकला होता.

न्यूझीलंडनं कर्णधार केन विल्यमसनला विश्रांती दिली आहे.
त्याच्या जागी टीम साऊदी (Tim Southee) न्यूझीलंडचे नेतृत्त्व करणार आहे.
न्यूझीलंडच्या टीममध्ये अनेक टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश आहे.
त्यांना हरवण्यासाठी टीम इंडियाला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार (IND Vs NZ) आहे.
तसेच टीम इंडियानं या सीरिजमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली असून तरूण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या जोडीची हि पहिलीच स्पर्धा आहे.

 

Web Title :- IND Vs NZ | india vs new zealand 2021 kyle jamieson opts out of t20 series to focus on tests

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतील 7000 पेक्षा जास्त गावांना दिली जाणार 4G मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी