IND Vs NZ : KL राहुलकडून विकेट कीपिंग करून घेणार्‍यावर सौरव गांगुलीचं ‘सूचक’ विधान, सांगितलं पंत कशामुळे झाला OUT

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतच्या जागी के.एल. राहुलकडून विकेटकीपिंग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते. विकेटकीपर फलंदाज म्हणून राहुलने संघात स्थान मिळवले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीच्या निर्णयावर भाष्य केले आहे.

न्यूझीलंडविरूद्ध टी-२० मालिकेत टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळेल का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता. ऑकलंडच्या पहिल्या टी-२० च्या आदल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने माध्यमांना आपला निर्णय कळविला. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोहलीच्या या निर्णयाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले कि, “हा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे. टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार यांनी के.एल. राहुलच्या भूमिकेबाबत निर्णय घेतला.”

मर्यादित षटकांत के.एल. राहुलची कामगिरी अतिशय प्रभावी ठरली आहे. मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर राहुलला विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून तो संघासाठी दुहेरी भूमिका साकारत असून पंत प्लेयिंग इलेव्हनच्या बाहेर आहे. गांगुली पुढे म्हणाला, “तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात चांगला खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याची कामगिरी ढासळताना दिसली. मर्यादित षटकांच्या स्वरूपात तो खूपच चांगला कामगिरी करत असून तो पुढेही अशीच कामगिरी करत राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, त्यांच्याविषयीचे सर्व निर्णय संघ व्यवस्थापनाचे आहेत. “

 

फेसबुक पेज लाईक करा –