इंदापूर : वनगळी येथे अपघातात युवक मृृत्युमुखी, एक गंभीर जखमी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – वनगळी (ता.इंदापूर) येथील पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर मोटारसायकलला डांबर वाहतुक करणार्‍या टिपरने जोराची धडक दील्याने मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृृृत्यु झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असुन जखमीवर इंदापूर येथील खासगी रूग्णांलयामध्ये उपचार सुरू असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दिली आहे.

सागर रामचंद्र जाधव ( वय ३० वर्षे, रा. कालठण नंबर १ तालुका इंदापूर ) असे अपघातात मत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे. फरान फरमान अन्सारी (वय २०)असे गंभीर जखमीचे नाव असुन याबाबतची फिर्याद ब्रम्हदेव ईश्वर देवकर राहणार सुगाव ता. इंदापूर यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान पूणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरुन सागर जाधव व त्याचा मित्र फरान फरमान अन्सारी वय २० वर्षे हे दोघे दुचाकी क्रमांक एम. एम .४२ ए. वाय . ५५३९ वर कालठण नंबर १ वरून इंदापूरला जात होते.

राष्ट्रीय महामार्गावर वनगळी येथील बिरोबा हॉटेल समोर एका पिवळ्या रंगाच्या डांबराच्या अज्ञात डंपर चालकाने भरधाव वेगात डंपर चालवून सागर चालवीत असलेल्या स्कुटीला समोरासमोर धडक देऊन अपघात केला. अपघातांमध्ये सागर याचा जागीच मृत्यू झाला तर फरान यास किरकोळ गंभीर दुखापत झाली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत..

You might also like