इंदापूरमध्ये बस-मोटार सायकल अपघातात व्यापार्‍याचा मृत्यू

इंदापूर :  प्रतिनिधी (सुधाकर बोराटे)  –   इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका, इंगुले मैदानावर थांबलेल्या मोटार सायकलस्वाराला बसने धडक दील्याने इंदापूरातील प्रसिद्ध केळी आडत व्यापार्‍याचा मृृत्यु झाला असुन बस ड्रायव्हर अपघातग्रस्त वाहनासह फरार झाल्याने अपघाताबाबत नागरीकांतुन संशय व्यक्त होत आहे.

याबाबतची खबर अस्लम याकुब चौधरी (वय३८) रा.श्रीराम चौक, इंदापूर ,जि.पूणे यानीं इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन जावेद नाजऊद्दीन बागवान (वय४०) रा.टेंभुर्णी नाका,इंदापूर, जि.पूणे असे अपघातात मयत झालेल्या केळी आडत व्यापार्‍याचे नाव आहे.

सोमवार दिनांक १० आॅगष्ट रोजी सकाळी ६ वा.चे सुमारास इंदापूरातील इंगुले मैदान येथील मोकळ्या मैदानात दररोज भरणार्‍या भाजीपाला विक्री मंडईमध्ये केळी विक्रीसाठी गाडा लावुन नाजऊद्दीन हे आणखी लागणारे सामान आणण्यासाठी त्यांचे युनीकाॅन कंपनीची एम.एच.१२,बी.के.०११८ या मोटरसायकल वरून ते मैदाना शेजारीच असलेल्या घरी गेले होते.व ते परत येताना मैदानावर थांबले असता जुना शहा रोडवरून आलेल्या पांढर्‍या रंगाच्या बसने त्यांचे मोटारसायकलला धडक दील्याने ते खाली जमीनीवर पडले.व बसचे पाठीमागचे चाक त्यांचे डोक्यावरून गेल्याने ते जागीच मयत झाले. अपघातग्रस्त बस ड्रायव्हरने अपघात घडल्यानंतर बस जागेवर न थांबवीता तो बस घेवुन तसाच निघुन गेल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.

इंदापूर शहरातील इंगुले मैदानावर सोमवारी सकाळी घडलेल्या अपघाताबाबत नागरीकातुन तर्क वितर्क काढले जात असुन, मोकळ्या मैदानावर मोटारसायकलसह उभ्या असलेल्या नाजऊद्दीन बागवान याला त्याच्या पाठीमागुन येणार्‍या बसने धडक दीली ही घटना संशयास्पद असल्याबाबत नागरीकांमध्ये दबक्या आवाजात कुजबुज सुरू असुन अपघात घडल्यानंतर बस ड्रायव्हरने बस न थांबवीता बस जोरात चालवित निघुन गेल्याने अपघाताबाबत नागरीकांनी संशय व्यक्त व्यक्त करत आहेत.