इंदापूर पोलीस रक्तदाण शिबीरात 45 बाटल्या रक्त संकलन

इंदापूर – महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीने रौद्र रूप धारण केले असुन, दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संखेंत वाढ होत असल्याने याबाबत राज्य सरकारने चिंता व्यक्त केली होती.तर राज्यात रक्तचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मागील आठवड्यात जाहीर केले होते.त्याअनुषंगाने इंदापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन आवारात पोलीस बांधवाचे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होउन ४५ बाटल्या रक्त संकलीत केल्याची माहीती गुप्त वार्ता विभागाचे गणेश झरेकर यांनी दीली.

रविवार दि.३१ मे रोजी सकाळी नऊ वाजता इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांचे हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीदीनी त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन करन्यात आले.यावेेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोहकरे, शिरीष लोंढे, अजित जाधव,दाजी देठे,बीरोबा लातुरे, डाॅ.सागर दोशी,
डाॅ.अणुजा दोशी, डाॅ.समीर मगर, महेश निंबाळकर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.तर रक्तदाण शिबीर सुरू झाल्यानंतर पूणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता पाटील यांनी यांनी या शिबीरास भेट देवुन पोलीस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

रक्तदाण शिबीरात इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, महिला पोलीस यांनी सहभाग नोंदवुन एकुण ४५ बाटल्या रक्तदाण केले.यासाठी सोलापूर ब्लड बँकेच्या माध्यमातुन शिबीर राबविण्यात आले.या ब्लड बँकेचे डाॅ.सचीन पारखे,डाॅ.किरण पाटील,टेक्निकल सुपरवायझर सत्यम गायकवाड यांचेसह त्यांचे कर्मचारी स्टाफचे सहकार्य लाभले. सहाय्यक पो.नि. गणेश लोहकरे, सहाय्यक पो. नि.दाजी देठे, पो.ना.शुभांगी खंडागळे, पो.शि.किशोरी बिडवे, पो.हवा. शंकर लोंढे,पो.काँ.अर्जुन,पो.काँ.चौधर,पो.काँ.मोहिते,पो.काँ.आमोल गारूडी यांचेसह सर्व पोलीसांनी शिबीरात सहभागी होउन रक्तदाण शिबीर यशस्वी केले.