Coronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 35 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण संखेच्या तुलनेत इंदापूर शहरातील पाॅझीटीव्ह रूग्णांची वाढती संख्या ही शहरातील नागरीकांची चिंता वाढविणारी असुन बुधवार दिनांक 23 सप्टेंबर सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यात एकुण 105 संशयीतांची तपासणी करण्यात आली असुन त्यामध्ये 35 रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले आहेत.तर त्यापैकी इंदापूर शहरात 10 रूग्णं पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूरकरांच्या चिंतेंत चांगलीच भर पडली आहे.तर इंदापूर तालुक्यात एकुण 2 हजार 278 रूग्ण पाॅझीटीव्ह झाले असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दीली आहे.

इंदापूर ऊपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड आटिंजन टेस्ट अंतर्गत 21 रूग्ण आढळले असुन त्यामध्ये इंदापूर शहरातील कसबा येथील 30 वर्षीय महिला, 06 वर्षीय चिमुकली, 55 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय पुरूष, इंदापूर दत्तनगर येथील 4 वर्षीय चिमुकला, इंदापूर सरस्वतीनगर येथील 22 वर्षीय पुरूष, सोनाईनगर इंदापूर येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.तर काटी येथील 54 वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील 85 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 16 वर्षीय मुलगा, 47 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, निरवांगी येथील 62 वर्षीय पुरूष, अंथुर्णे येथील 20 वर्षीय युवक, 65 वर्षीय महिला, व गागरगाव येथील 42 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

भिगवण येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये 30 संशयीतांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट करण्यात आली असुन त्यामध्ये 10 रूग्णं पाॅझीटीव्ह आढळले आहेत.अकोले येथील 24 वर्षीय युवक,19 वर्षीय युवती,55 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरूष, भिगवण येथील 26 वर्षीय महिला,मदनवाडी येथील 70 वर्षीय महिला,65 वर्षीय पुरूष, भादलवाडी येथील 38 वर्षीय महिला,23 वर्षीय युवक, डाळज न.१ येथील 35 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये 04 रूग्ण पाॅझीटीव्ह आले असुन बेलवाडी येथील 31 वर्षीय महिला, वरकुटे खुर्द येथील 35 वर्षीय पुरूष, शिराळा टेंभुर्णी येथील 64 वर्षीय पूरूष, व कालठण नं.१ येथील 37 वर्षीय पुरूषाचा समावेश असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांनी दीली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like