इंदापूरात तालुक्यात ‘कोरोना’चा उद्रेक ! दिवसभरात 16 नवे पाॅझीटीव्ह तर एकाचा मृृत्यु

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमीत रूग्णांच्या संपर्कात असणार्‍या व परवा स्वॅब घेण्यात आलेल्या 20 संशयीतां पैकी 11 जणांचा रिपोर्ट पाझीटीव्ह आला आहे.तर इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयामध्ये रॅपीड टेस्टमध्ये आज दिवसभरात 5 जण पाॅझीटीव्ह सापडल्याने आज दीवसभरात पाॅझीटीव्ह रूग्णांचा आकडा हा 16 वर गेला आहे.यामुळे तालुक्यातील नागरीकामध्ये घबराटीचे वातावरण असुन भिगवण येथील एकाचा इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयामध्ये उपचार सूरू असताना मृृत्यु झाला असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी दीली,

दर दिवसागणीक कोरोणाच्या रूग्णांमध्ये होत असलेली वाढ ही इंदापूर तालुक्यातील नागरीकांची धाक-दुक वाढविणारी असुन कोरोनाचे चक्र थांबता थांबत नसल्यामुळे नागरीक सध्या कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत.तर परवा 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट आला असुन त्यापैकी 11 जण पाॅझीटीव्ह आले असुन सनसर येथील एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.तर कुरवली 1, माळवाडी 1, माळवाडी नं.2 राऊत वस्ती 1 असे एकुण 11 पाॅझीटीव्ह आलेआहेत.

तर इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयामध्ये रॅपीड टेस्ट अंतर्गत काल एकुण 8 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 5 जण पाॅझीटीव्ह असुन निमगाव केतकी 3,कळाशी 1, व भिगवण 1 असे एकूण 5 जण पाॅझीटीव्ह आल्याने आज दिवसभरात एकूण 16 पाॅझीटीव्ह झाले आहेत. इंदापूर तालुक्यात कोरोनारूपी संकटाचा मोठा शिरकाव होत असल्याने कोरोना दिवसभर बाहेर फिरू देइना व रात्रभर भीतीने झोपू देइना अशी गत सध्या इंदापूर तालुक्यातील नागरीकांची झाली असुन त्यातच भिगवण येथील एकाचा आज मत्यु झाल्याने कोरोनाचे रूप अधाकच भयावह होत चालल्याचे चीत्र निर्माण झाले असल्याने नागरीक कोरोनाच्या दहशतीखाली असल्याचे दीसुन येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी नागरीकांनी दक्षता घेणे व शासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालण करणे प्रत्येक नागरीकाच्या आरोग्याच्या हीताच्या दृृृृष्टीने आवश्यक असुन बेपर्वाइने वागल्यास कोरोना कोणालाही सोडेल अशी परीस्थीती सध्यातरी नसल्याने नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.