इंदापूर : भांडण सोडविणाऱ्यास बेदम मारहाण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यातील मौजे कौठळी-बळपुडी येथील मोहन धोंडीबा काळेल यांच्या घरासमोरील शेतातील शिव रस्त्यावर दत्तात्रय चोरमले यास सोमनाथ गेणा काळेल, संदीपान गेणा काळेल व भोजराज सोमनाथ काळेल हे तीघे जण मिळून मारहाण करत असल्याचे पाहील्यानंतर त्यांच्यात लागलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेले मोहन काळेल यांना व त्यांचे कुटुंबातील इतर सदस्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १४ जानेवारी रोजी सकाळी कौठळी-बळपुडी शिवरस्ता येथे घडली असुन त्याबाबतची फिर्याद मोहन धोंडीबा काळेल (वय ५० वर्षे) रा. बळपुडी, ता.इंदापूर, जि. पुणे यांनी इंदापूर पोलीसात दिली आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी मोहन धोंडीबा काळेल हे दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वा. चे सुमारास त्यांचे स्वत:चे घरी असताना फिर्यादीचे घरासमोरील शेतातील कौठळी-बळपुडी शिव रस्त्यावर भारत दत्तात्रय चोरमले यास संदीपान गेना काळेल, सोमनाथ गेना काळेल, भोजराज सोमनाथ काळेल हे तिघेजण मिळुन शेताचे बांधाचे कारणावरून मारहाण करत होते. ही घटना फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर ते भांडण सोडविण्यासाठी पळत जाऊन भारत चोरमले यास त्यांचे तावडीतून सोडवीत असताना वरील लोकांनी फिर्यादी यांनाच काठीने व दगडाने मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ व आई तेथे पळत आले व त्यांनी मारहाण करणार्‍यांना मारू नका, तुमचे आमचे भांडण नाहीत. त्यावर त्यांनी तुम्हीच आमची भांडणे लावत आहात असे म्हणून फिर्यादी, त्यांचा भाऊ व आई यांना काठीने व दगडाने जबर मारहाण केली. त्यानंतर आम्ही आमचे घरी आलो असता पुन्हा भोजराज काळेल व बाळुबाई दत्तु शिंदे यांनी आमचे घरी येऊन परत फिर्यादी व त्याचे घरातील लोकांना शिवीगाळ व करून दमदाटी देऊन काठीने व दगडाने मारहाण केली असले बाबतची फिर्याद मोहन धोंडीबा काळेल यांनी वरील चार जणांविरोधात इंदापूर पोलीसात दाखल केली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/