इंदापूर-वरकुटे खु.येथील खासगी सावकारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या, 2 आरोपींना अटक

इंदापुर : पोलीसनामा ऑनलाइन – वरकुटे खु.(ता.इंदापुर) येथे २० हजार रूपये मुद्दलावर सहा महिण्यात पठाणी व्याजासह १ लाख ८० हजार रूपये वसुल करणार्‍या दोन (सख्खे बंधु) अवैध सावकारा विरोधात त्याच गावातील एका महीलेने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली असुन पोलीसांनी संबधीत अवैध सावकारांवर गुन्हा दाखल करून सावकारांना अटक करून कोर्टात हजर केले असता एक दीवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

दिपक भट्टु मोरे व कांतीलाल भट्टु मोरे.रा. वरकुटे खु.ता. इंदापूर, जि.पूणे असे गून्हा दाखल झालेल्या अवैध सावकाराची नावे असुन त्यांचे विरोधात सौ.निता संतोष शिंदे.रा.मीसाळ वस्ती,हराळीचे शेत,वरकुटे खु.ता.इंदापूर,जि.पूणे यांनी दि.२७ जून रोजी इंदापूर पोलीसात फिर्याद दीली असुन फीर्यादीत म्हटले आहे की दि.१७ डीसेंबर २०१९ रोजी आरोपी दीपक मोरे या खासगी सावकाराकडून फिर्यादीचे पती संतोष शिंदे यांनी महींद्रा पीकअप गाडीचा इन्सुरन्स भरण्यासाठी २० हजार रूपये, महीना २०टक्के व्याजदराने घेतले होते. सदर पैसे देताना सावकाराने पैशाला तारण म्हणून फिर्यादी यांचे पतीच्या नावे असलेली स्प्लेंडर मोटार सायकलची कागदपत्र ठेवुन घेतली होती.

फीर्यादी यांचे पतीने संबधीत सावकाराचे प्रत्येक महीण्याला व्याज व मुद्दलासह एकुण ८० हजार रूपये सावकारास परत फेड केलेली असताना देखील दि.१७ जून २०२० रोजी सायंकाळी अवैध सावकार दिपक मोरे व त्याचा भाऊ कांतीलाल यांनी फिर्यादी यांचे घरी येवुन फिर्यादी यांचे पतीने घेतलेले पैसे मुद्दल व त्याचे व्याजासह एक लाख रूपये येणे बाकी आहे. ते द्या असे म्हणून फिर्यादी यांचे पतीच्या नावे असणारी एम.एच.१२, जी.टी. ९२७४ या नंबरची महींद्रा पिकअप गाडी ही फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ,दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत आणखीण एक लाख रूपये आणून द्या व गाडी घेवुन जावा असे म्हणुन पीकअप गाडी घेवुन गेले असल्याबाबत फिर्यादीत म्हटले असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बीराप्पा लातुरे हे करत आहेत.