भारतात TikTok आणि PUBG सह आत्तापर्यंत 224 चिनी अँप्स वर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनशी सुरु असणाऱ्या सीमा वादामुळे नरेंद्र मोदी सरकारने चिनी अर्थव्यवस्थेला मोठा झटका देत आणखी 118 चिनी अँप्स वर बंदी घातली आहे. आत्तापर्यंत 224 चिनी अँप्स वर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

भारताने आत्तापर्यंत तीन टप्प्यात 224 चिनी अँप्स वर बंदी घातली. पहिल्या टप्प्यात भारत सरकारने टिकटॉक, लायकी, शेयर इट सारख्या 59 अँप्स वर बंदी घातली होती, तेव्हा सरकारने सुरक्षेचे कारण सांगितले होते.

त्यानंतर केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यात 49 अँप्स वर बंदी घातली, आणि आता 118 अँप्स वर बंदी घातली असून आत्तापर्यंत 224 चिनी अँप्स वर बंदी घालण्यात आली आहे.

चीनसोबत पुन्हा सुरु झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पबजी सह 118 मोबाईल अँप्स वर बंदी घालण्याची घोषणा केली.

इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्राद्योगिक मंत्रालयाने कलम 69ए नुसार या मोबाईल अँप्स वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयाने सांगितले की या अँप्समुळे अनेक अडचणी समोर येत होत्या त्यामुळे यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेचे कारण सांगितले आहे.

भारत सरकारने जूनच्या शेवटच्या आठवड्यात टिकटॉक, लायकी, शेयर इट सारख्या 59 अँप्स वर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैच्या शेवटी 49 अँप्स वर बंदी घातली, आणि आता पबजीसह लिविक, वुई चॅट वर्क आणि वुई चॅट रिडींग, एपलॉक, कॅरम फ्रेंड्स सारख्या अँप्स वर बंदी घातली आहे.