U – 19 Asia Cup : भारताचा उपांत्य सामन्यात प्रवेश, पाकिस्तानला 60 धावांनी हरवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेमध्ये खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील आशिया कप मध्ये भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ६० धावांनी धूळ चारली आहे. सोबतच मालिकेच्या उपांत्य सामन्यात स्थान मिळवले आहे. सुरवातीला अफगानिस्तान सोबत हरल्यानंतर आता भारतासोबत हरल्यामुळे पाकिस्तानला मालिकेतून बाहेर पडावे लागले. भारताचा उपांत्य सामना येत्या ९ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान सोबत होणार आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो एकदम योग्य ठरला. भारताचा पहिला गाडी ३८ धावा करून परतला. यानंतर अर्जुन आजाद आणि टिळक वर्मा यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये १८३ धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी आपले शतक झळकावले. आजाद १२१ या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला तर सामन्याच्या ४७ व्या ओव्हर मध्ये ११० धावा काढून अब्बास आफ्रिदीच्या चेंडूवर तो झेल बाद झाला.

सामन्यात भारताचे उत्क्रष्ट प्रदर्शन
हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर गतीने धावा काढण्याच्या प्रयत्नात भारताचे कालांतराने विकेट पडत गेले. भारताने निर्धारित ५० ओव्हर मध्ये आपले ९ फलंदाज गमावत ३०५ धावा करू शकला. पाकिस्तान कडून नसीम शाह आणि अब्बास आफ्रिदी यांनी ३-३ फलंदाज बाद केले. भारताने दिलेल्या ३०६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरवात म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. पाक चा पहिला विकेट १६ धावांवर पडला. अवघ्या ५३ धावांवर पाकिस्तानचे २ फलंदाज बाद झाले. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नाजीर ने मोहम्मद हॅरिस च्या सोबतीने १२० धावांची भागीदारी केली. त्यावेळेस पाकिस्तान हा सामना विजयी होऊ शकेल असे वाटत होते. परंतु, अंकोलेकर यांनी हारिसला तो ४३ धावांवर असताना बाद केले.

६० धावांनी पाकिस्तानवर मात
यानंतर पाकचा नासिर मैदानावर ठाण मांडून उभा राहिला. त्याने शानदार शतक झळकावले. परंतु, संघातील बाकीच्या खेळाडू मैदानावर तग धरू शकले नाहीत. ते केवळ ११७ धाव बनवून परतले. भारतीय फलंदाजांनी ४६.४ ओव्हर मध्ये पाकिस्तानला २४५ धावांवर रोखले. अशा रीतीने भारताने भारताने हा सामना ६० धावांनी जिंकला. अर्जुन आजाद यांनी चांगली खेळी केल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.