काळ्या पैशावाल्यांची खैर नाही, भारताला पुन्हा मिळाला ‘स्विस’ बँक खात्यांचा तपशील

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला स्विस बँक खात्याच्या तपशिलाची दुसरी बॅच मिळाली आहे. ही माहिती स्वित्झर्लंडसोबत ऑटोमेटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन पॅक्ट अंतर्गत प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारच्या काळ्या पैशाविरूद्ध सुरू केलेल्या मोहिमेमध्ये हे एक मोठे यश मानले जाते.

सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा मिळाली होती माहिती
भारत अशा 86 देशांचा भाग आहे, ज्याच्यासोबत स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) माहिती सामायिक करण्याचा पॅक्ट केला आहे. भारतासाठी स्विस खात्यांशी संबंधित माहिती सर्वप्रथम सप्टेंबर 2019 मध्ये प्राप्त झाली होती.

ADV

31 लाख खात्यांची माहिती 86 देशांसोबत सामायिक केली आहे
एफटीएने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की सुमारे 31 लाख खात्यांची माहिती 86 देशांशी सामायिक केली गेली आहे. दरम्यान, भारत विषयी स्वतंत्र माहिती देण्यात आलेली नाही. परंतु वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की एफटीएने माहिती सामायिक केलेल्या प्रमुख देशांमध्ये भारत आहे.

यापूर्वीही भारताला मिळाली महत्वाची माहिती
मोठ्या प्रमाणात स्विस खात्यांमध्ये भारतीयांशी खाती जोडल्या गेल्याचीही माहिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त स्विस प्रशासनाने यापूर्वी 100 भारतीय नागरिकांच्या खात्यांशी संबंधित माहितीही भारताशी शेअर केली आहे.

राजकीय मुद्दा आहे काळा पैसा
दरम्यान, काळा पैसा हा एक राजकीय मुद्दा आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काळा पैसा हा मोठा मुद्दा बनविला. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान झाल्यावर 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने केलेल्या नोटाबंदीमागील एक प्रमुख कारण म्हणून काळा पैसा देखील दर्शविला गेला.