‘या’ 5 देशाकडून भारत करतं कच्च्या तेलाची खरेदी, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सऊदी अरामको वर ड्रोन हल्ला झाल्यानंतर क्रूड ऑइलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की याचा परिणाम भारतीय उपभोक्त्यांवर होऊ शकतो. कारण सौदी भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल आयातदार देश आहे. भारत याशिवाय इतर देशांकडून देखील तेल आयात करतो.

भारताने एप्रिल 2017 पासून फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वात जास्त तेल इराकवरुन आयात केले आहे. या कच्च्या तेलाचे प्रमाण 4.22 कोटी मॅट्रिक टन आहे.

दुसरा नंबर आहे सौदी अरबचा. भारत सौदीकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. एप्रिल 2017 पासून फेब्रुवारी 2018 मध्ये भारताने 3.39 कोटी मॅट्रिक टन तेल आयात केले.

यानंतर नंबर आहे इराणचा. भारताकडून इराणमधून 2.04 कोटी मॅट्रिक टन तेल आयात करण्यात आले.
1.67 कोटी मॅट्रिक टन एवढे तेल भारतात वेनेजुएला मधून आयात करण्यात येते.

भारतचे टॉप 5 तेल आयात करणाऱ्या देशाच्या पाचव्या स्थानी नायजेरियाचा नंबर लागतो, भारताने जवळपास 1.63 कोटी मॅट्रिक टन तेल आयात करते.