भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर आज भारताने पाकिस्तानला दिले आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सैनिकांचे आभिनंदन केले. तसेच भारत हा कमजोर देश नाही हेच सैन्याने दाखवून दिल्याचे त्यांनी म्हंटले आज मुंबई येथे विधानसभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “भारत हा कमजोर देश नाही. पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा होशोब पाकिस्तान कडून घेतला जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. तसेच भारतीय सेनेला या हल्ल्याच्या संदर्भात पूर्ण अधिकार दिले होते. आम्हाला भारतीय सेनेचा अभिमान आहे. जगातल्या मजबूत सेनेपैकी आमचा एक देश आहे. असे सांगत सैन्य दलाचं मनपूर्वक आभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त
भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. बालाकोट, चकोटी, मुज्जफराबाद या तीन ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. भारताच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी या तीन ठिकाणी १ हजार किलो बॉम्बफेक करुन ही कारवाई केली आहे. पहाटे साडेतीन वाजता केलेल्या या हल्ल्यात भारताची सर्व विमाने आपले ठरलेले लक्ष्य साधून काही मिनिटातच परत सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परत आली आहेत. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद याच्या कॅम्पचे किती नुकसान झाले, याची काही काळानंतरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु