‘कोरोना’ महामारीचं औषध फक्त मनाची शक्ती, वाचा ICC मधील PM मोदींच्या भाषणातील ‘या’ 10 खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) विशेष कार्यक्रमाला संबोधित करीत होते. या दरम्यान पंतप्रधान म्हणाले, देशात अनेक अडचणी येत आहेत. आज देशात कोरोना विषाणू आहे, कोरोनाचे एक आव्हान आहे, काही ठिकाणी आग लागते तर काही ठिकाणी भूकंप येत आहेत. याच दरम्यान दोन चक्रीवादळही आली आहेत. कधीकधी वेळ देखील आपली परीक्षा घेत असतो. मात्र या सर्वावर एक औषध आहे ते म्हणजे मनाची शक्ती.

आयसीसीच्या 95 व्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या काळातमध्ये देशाला स्वावलंबी असणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मोठ्या सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे
1. पंतप्रधान म्हणाले, आज संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढा देत आहे, कोरोना वॉरियर्सबरोबरच्या या लढाईत देश मागे नाही. आता देशवासीयांच्या मनात एक संकल्प आहे की आपत्तीला एक संधीमध्ये रुपांतर करायचे, हे संकट देशाचे टर्निंग पॉईंट बनवले पाहिजे. आत्मनिर्भर भारतच टर्निंग पॉईंट आहे.
2. पंतप्रधान मोदी म्हणाले, आमची संकल्प शक्ती आपला पुढचा मार्ग ठरवते. ज्याने कधीच हार मानली आहे, त्याला समोर नवीन संधी दिसत नाहीत, अशा परिस्थितीत जो माणूस सतत जिंकण्याचा प्रयत्न करतो त्याला यश मिळते आणि नवीन संधी येतात.
3. आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पहावं लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे.
4. 5 वर्षानंतर संस्था 100 वर्षे पूर्ण करणार आहे. 2022 मद्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. अशातच आत्मनिर्भर भारत अभियान पूर्ण करण्याची ही योग्य वेळ आहे आहे.
5. ते म्हणाले, आज देशवासियांच्या मनात एक इच्छा आहे, जर आपण वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी असतो, जर आपण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर असतो, सौर पॅनेलच्या क्षेत्रात आपण स्वावलंबी असतो, अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये आपण आत्मनिर्भर व्हावे अशी देशवासीयांची इच्छा आहे.
6. पीएम मोदी म्हणाले, स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरु आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकत्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जातं.
7. पीएम मोदी म्हणाले, स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारे बळकटी दिली जात आहे. उत्तर – पूर्व सेंद्रीय शेतीचे केंद्र बनण्याचा प्रयत्न आहे, जर आयसीसीचा निर्धार असेल तर ते आपली जागतीक ओळख बनवू शकतात.
8. शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नुकतेच घेण्यात आलेल्या निर्णयांनी कृषी अर्थव्यवस्थेला अनेक वर्षांच्या गुलामीतून मुक्त केले. आता भारतातील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने, देशातील कोठेही विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
9. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज कोणतीही कंपनी आपला मालाचे प्रपोजल थेट पीएमओकडे पाठवू शकते. लोकांना GEM मध्ये सहभागी व्हावे लागेल. जेणेकरून सरकारनेही देशांतर्गत कंपन्यांचा माल खरेदी करवा.
10. पाच वर्षापूर्वी देशात एक एलईडी बल्ब 350 रुपयांना मिळत होता. परंतु आता तो 50 रुपयांना मिळतो. कोट्यावधी लोक एलईडी बल्बचा वापर करत आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाला आणि त्याचा फायदाही झाला.