पोस्ट ऑफिसची योजना, आता ग्राहकांना मिळणार ‘ही’ नवीन सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – मागील काही वर्षांमध्ये भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना पोस्ट सेवेच्या माध्यमातून अनेक नवीन सुविधा देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. सुकन्या समृद्धि योजना सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर पोस्टाच्या माध्यमातून बँकिंग सुविधा देण्याचा देखील सरकार प्रयत्न करत आहे. मात्र आता सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये नवीन सेवा सुरू केली असून यामुळे तुम्ही घरी बसल्या पोस्टातील कामे करू शकता.

डिपार्टमेंट ऑफ पोस्टाने बचत खातेधारकांसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरु केली असून तुम्ही या माध्यमातून तुमची सर्व कामे करू शकणार आहात. या नवीन सुविधेमुळे शेतकरी विकास पत्र, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट या सर्व सेवांचा लाभ तुम्ही घरी बसल्या घेऊ शकता. त्याचबरोबर खात्यातील शिल्लक  आणि विविध सेवांची माहिती तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. तसेच ट्रांजेक्‍शन हिस्‍ट्री  आणि इतर प्रकारची माहिती तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. याआधी  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसाठी मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध आहे.

दरम्यान, गुगलच्या प्ले स्टोअरवरून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. पोस्ट विभागाचे सचिव ए.एन.नंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1,55,000 पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना लाभ दिला जाणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी