अभिमानास्पद ! महाराष्ट्र देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य ; जाणून घ्या देशातील ‘टॉप’ ५ राज्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील अनेक राज्य नैसर्गिक संसाधनांमुळे श्रीमंत आहेत. अनेक राज्यांचा जीडीपी आणि आर्थिक वाढ दरवर्षी वाढत आहे. या राज्यांमुळे भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत तर आहेच शिवाय जगातील इतर देशांपेक्षा या राज्यांची ओळख मोठी आहे. भारतातील काही राज्ये अशी आहेत ती देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. देशातील या राज्यामध्ये महाराष्ट्राचा अव्वल नंबर लागतो.

महाराष्ट्र : भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. याचबरोबर सर्वात जास्त शहरे याच राज्यात आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे तिसरे राज्य आहे तर लोकसंख्याबाबत उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ४० टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून देशाला मिळते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून २०१४ मध्ये जवळपास २९५ अब्ज डॉलर घरगुती उत्पानतून मिळाले होते. यामध्ये वाढ झाली असून ते ३९८ बिलीयन झाले आहे. महाराष्ट्रात पुणे, नवी मुबई, मुबई, नागपुर, औरंगाबाद आणि लातूर हे दळवळणाची प्रमुख शहरे आहेत.

तामिळनाडू : तामिळनाडू हे भारतातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच हे भारतातील सर्वात जास्त साक्षर राज्यापैकी एक आहे. तामिळनाडूत औद्योगिकरण वेगाने वाढत चालले  आहे. अनेक मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांचे प्रकल्प या राज्यात उभारले गेले आहेत. तामिळनाडूचा एकूण जीडीपी १३ हजार ८४२ बिलीयन आहे. २०१४-१५ मध्ये तामिळनाडूतील प्रति व्यक्तीचे वेतन ३ हजार डॉलर होते.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश भारताच्या अर्थव्यवस्थेतील तीसरे राज्य आहे. या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. औद्योगिकदृष्या हे राज्य मागास असले तरी छोटे उद्योग या राज्यात आहेत. त्यातून राज्याला उत्पन्न मिळते. सेवा क्षेत्रातून खासकरून पर्यटनातून या राज्याला चांगले उत्पन्न मिळते. उत्तर प्रदेशला कृषी राज्य म्हणून ओळखले जाते. कारण भारतात पौष्टिक धान्य निर्मितीसाठी या राज्याचे १९.९ टक्के योगदान आहे.

गुजरात : हा देशातील सर्वात प्रभावी आणि अत्यंत प्रतिष्ठित राज्यांपैकी एक आहे. सध्याचा जीडीपी १२.७५ लाख कोटी रुपये आहे. व्यापारासाठी गुजरातला अनुकूल राज्य मानले जाते.

कर्नाटक : दक्षिण भारतातील सहजतेने विकसित होणारे हे राज्य आहे. या राज्याचा जीडीपी १२.८० लाख कोटी आहे. कर्नाटकच्या विकासात बंगलोर किंवा बेंगलुरू चा मोठा वाटा आहे. राज्यात मोठा आयटी आहे उद्योग आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like