भारताच्या हवाई हल्ल्यात २५० दहशतवादी ठार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे २५० दहशतवादी ठार झाल्याचे समजते. भारताने केलेल्या हल्ल्यात जैश- ए- मोहम्मद या दशतवादी संघटनेचे कंट्रोल रूम नष्ट झाले असून या हल्यात २५० दहशतवादी ठार झाले असल्याचा संभव आहे.

आज मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने केलेल्या कार्यवाहीत जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे. या कार्यवाहीत जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेची कंट्रोल रुम अल्फा-३ संपूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘मिराज २०००’ या विमानांच्या सहाय्याने हे एअर स्ट्राईक करण्यात आले आहे. हवाई दलाची १२ विमाने पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेली होती. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याची दाट शक्यता आहे. मात्र या बाबत भारतीय लष्कराने कोणताही दुजोरा दिला नाही. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत या हल्ल्या बाबत फक्त औपचारिक दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनी हि अद्याप विस्तृत माहिती दिली नाही. दरम्यान भारतीय नागरिकांनी भारतीय हवाई दलाच्या हल्ल्याचे स्वागत आणि कौतुक केले जाते आहे.