पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारताच्या ‘मिराज 2000’च्या 10 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन,मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. हाती आलेल्या माहितीनुसार ,  या हल्ल्याने पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तान कधीही हमला करू शकतो त्यासाठी भारताने हवाई दलाला हायअर्लट दिला आहे. मात्र भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही तातडीची बैठक बोलविली आहे.

भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्थरिय बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत संरक्षण मंत्री निर्मला सितारमण, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, एनएसए अजीत डोवाल हे उपस्थित आहेत.

दरम्यान, आधीपासून या हल्ल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पुलवामा हल्ला झाल्यावर नरेंद्र मोदींनी भलीमोठी प्रतिक्रिया न देता थोड्या शब्दात दिली होती. पाकिस्तानने मोठी चुक केली आहे, ज्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असं मोदींनी म्हटलं होते. त्यानंतर आता हा हल्ला करण्यात आला आहे.

https://twitter.com/ANI/status/1100252105648951296

https://twitter.com/ANI/status/1100253132209209344