सट्टेबाजांचा अड्डा ‘उध्वस्त’ ! 70 मोबाईल अन् 7 लॅपटॉप हॅन्डल करत होते 11 ‘बुकी’, भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर 2 कोटींचे ‘बेटिंग’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – बँगलोर येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या आणि निर्णायक लढतीमध्ये विजय मिळवून भारताने ही मालिका जिंकण्यात मोठे यश मिळवले आहे. मात्र या सामन्यावर चक्क दोन कोटींचा सट्टा लागला होता. कर्नाटक क्राईमब्रांचने हे रॅकेट उध्वस्थ करत अकरा जणांना अटक केली आहे.

यावेळी पोलिसांनी कारवाई करताना 70 मोबईल, 2 टिव्ही आणि 7 लॅपटॉप जप्त केले आहेत. या आधी देखील पोलिसांनी सट्ट्या प्रकरणी काही जणांना अटक केली होती.

मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता मात्र त्यानंतरचे दोनीही सामने जिंकत भारताने मालिका आपल्या खिशात घातली. ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरनंतर भारताला 287 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 47.3 ओव्हरमध्ये करत आणखी एक मालिका विजय भारताला मिळवून दिला.

भारताने जिंकली सलग सहावी मालिका
या आधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मार्च 2019 मध्ये लढत झाल्याचे पहायला मिळाले होते. आतापर्यंत दोनीही देशांमध्ये बारा मालिका खेळल्या गेलेल्या आहेत. यामध्ये दोनीही देशांनी प्रत्येकी सहा – सहा मालिका जिंकल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like