नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कोणताही सामना हा अटीतटीचा आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा असतो. भारत आणि पाकिस्तान मधील संबंधामुळे दोन्ही देशांमध्ये बऱ्याच वर्षापासून द्विदेशीय मालिका खेळवण्यात आली नाही. विश्वचषकामध्ये हे दोन संघ आमने सामने आले आहेत. पण दोन्ही देशांमध्ये सामने झालेले नाहीत. आज या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक क्रिकेटचा समाना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत किंवा पाकिस्तानात देशात नाही तर शारजामध्ये खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये शेवटचा सामना 2008 मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र, अखेरची क्रिकेट मालिका 2013 मध्ये खेळवण्यात आली होती. त्यामुळे तब्बल 13 वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात आली नव्हती. पण आज भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एक सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना शारजामध्ये रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये शारजात होत असलेला टेनिस क्रिकेटचा सामना आज रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. हा सामना 10 षटकांचा होणार आहे. भारत पाकिस्तानमधील हा क्रिकेटचा सामना शारजा येथील क्रिकेट स्टेडीयमवर होणार असून या सामन्यात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय संघ
अंकुर सिंग, ओंकार देसाई, थॉमस डायस, मोयोद्दिन शेख, कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, सुमीत देखणे, योगेश पेणकर, अजित मोहिते, दिनेश नाडकर्णी, सरुज, विश्वनाथ ताकूर, जाफर जमाल, विजय पावळे, सुलतान खान. भारतीय संघाचे प्रशिक्षक भरत लोहार असून व्यवस्थापक जावेद शेख आहेत.