India Vs South Africa 2021 | ऐतिहासिक क्षण ! भारताने पहिला कसोटी सामना जिंकला; दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

सेंच्युरियन : वृत्तसंस्था – India Vs South Africa 2021 | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटीत भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी (India Vs South Africa 2021) पराभव केला. गुरुवारी सामन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवशी 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 191 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सेंच्युरियन (Centurion) मैदानावर भारतीय संघाने (Team India) कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सोडून आफ्रिकेचा या मैदानावर पराभव करणारा भारत फक्त तिसरा देश आणि आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेशिवाय टीम इंडियाने यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही कसोटी सामने जिंकले आहेत. संघाने हा पराक्रम केवळ दुसऱ्यांदा केला आहे. यापूर्वी 2018 मध्येही भारताने हे केले होते. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकल्या. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने प्रत्येकी एक कसोटी जिंकली. 2021 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी १ कसोटी जिंकली. इंग्लंडमध्ये 2 कसोटी जिंकण्यात संघाला यश आले. मात्र, 2021 मध्ये या अर्थाने पहिल्यांदाच संघ ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यात यशस्वी झाला. तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली. 2018 मध्ये, संघाने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये मालिका गमावली होती. त्यामुळे 2021 चा विजय हा भारतीय क्रिकेटच्या 89 वर्षांच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षण म्हणता येणार आहे. (India Vs South Africa 2021)

दरम्यान, पहिल्या कसोटीच्या 5 व्या दिवशी भारताने विजय मिळवला असला तरी त्याचा पाया चौथ्या दिवशी रचला गेला होता.
काल (बुधवारी) दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या होत्या.
भारताच्या जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) अखेरच्या षटकात विकेट घेऊन आफ्रिकेला दणका दिला होता.
त्यानेच आज (गुरूवारी) अखेरच्या दिवशी आफ्रिकेला पहिला धक्का दिला.
काल दिवसभर शानदार फलंदाजी करणारा आणि भारताच्या विजयातील सर्वात मोठं सकट असणारा कर्णधार डीन एल्गर (Captain Dean Elgar) याला बुमराहने 77 रणांवर बाद केले.
एल्गरच्या विकेटने भारताला विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Web Title : India Vs South Africa 2021 | indias historic victory in 1st test against south
africa at centurion and took a 1 0 lead in the series

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात