IND vs SA : कॅप्टन विराटनं तोडलं ‘हिटमॅन’ रोहितचं वर्ल्ड रेकॉर्ड, दुसऱ्या T-20 मध्ये बनलेल्या सर्व प्रमुख आकड्यांवर एक ‘नजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून मात केली. नाणेफेक जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले असता कर्णधार क्विंटन डी कॉक याच्या अर्धशतकाच्या आणि टेम्बा बवुमा याच्या शानदार 49 धावांच्या नमदतीने दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 149/5 धावा केल्या.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सने सहज मात दिली.

भारताच्या वतीने कर्णधार विराट कोहली याने शानदार 72 धावांची अर्धशतकी खेळी. कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 19 षटकांतच आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच भारतीय संघाने या सामन्यात अनेक विक्रमांची देखील नोंद केली. नजर टाकुयात या विक्रमांवर..

1) विराट कोहली याने या सामन्यात 72 धावा करतानाच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्याने (2441 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील रोहित शर्मा याने 2434 धावा केल्या आहेत.)

2) कोहलीने या सामन्यात टी-20 क्रिकेटमधील आपले 22 वे अर्धशतक साजरे केले. याबाबतीत त्याने पुन्हा एकदा रोहित शर्मा याचा 21 अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला.

3) विराट कोहली याने कालच्या सामन्यात सामनावीराचा ‘किताब मिळवण्याबरोबरच टी-20 क्रिकेटमध्ये ११ वेळा हा ‘किताब पटकावण्याचा पराक्रम कला आहे. या बाबतीत कोहलीच्या पुढे केवळ अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी आहे. त्याच्या नावावर 12 किताब आहेत.

4) विराट कोहली याने 32 व्यांदा टी-20 सामन्यांत 30 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

5) भारतीय संघाने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला भारतात पराभूत केले आहे. दोन्ही संघांमध्ये आजपर्यंत झालेल्या 14 टी-20 सामन्यांत भारतीय संघाने 9 वेळा विजय मिळवला हं तर आफ्रिकेने 5 वेळा विजय मिळवला आहे.

6) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला गेलेला हा पहिला सामना होता ज्यात महेंद्रसिंह धोनी खेळला नाही.

7) या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बवुमा, ब्योर्न फॉर्टुइन आणि एनरिक नॉर्टजे यांनी पदार्पण केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आता 85 झाली आहे.

Visit – policenama.com