पुढील ४० वर्षात सर्वाधीक मुस्लिम भारतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवाडीनुसार पुढील ४० वर्षानंतर भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश असेल. येत्या ४० वर्षामध्ये जगाची लोकसंख्या कशी वाढली. याबद्दलचा आढावा प्यू रिसर्च सेंटकरकडून देण्यात आला आहे. २०६० मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केली आहे.

इंडोनेशीयात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असून मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत त्याचा पहिला क्रमांक लागतो. २०१५ च्या आकडेवारीनुसार, इंडोनेशिया २२ कोटी मुस्लिम वास्तव्यास आहेत. या यादीत सध्या भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतात १९ कोटी ४८ लाख १० हजार मुस्लिम राहतात. शेजारी पाकिस्तान याच यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानमध्ये १८ कोटी ४० लाख मुस्लिम धार्मीयंची संख्या आहे. तर बांग्लादेशाचा चौथ्या आणि नायजेरियाचा पाचवा क्रमांक लागतो.

प्यू रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०६० मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश होईल. २०६० मध्ये भारतातील मुस्लिम धर्मीयांची संख्या ३३ कोटी ३० लाख ९० हजार इतकी असले. त्यावेळी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मीयांचे प्रमाण १९.४ टक्के होईल. तर जगामध्ये ११.१ टक्के मुस्लिम लोकसंख्या भारतात असेल.