… तर भारत ‘ हिंदू ‘ पाकिस्तान बनेल, काँग्रेस नेत्याचा वादग्रस्त दावा 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

२०१९ मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत आली तर भारत ‘ हिंदू ‘ पाकिस्तान बनेल असा वादग्रस्त दावा काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे. यावरून भाजपावर शशी थरूर यांनी पुन्हा निशाणा साधल्याचे दिसून आले आहे.
[amazon_link asins=’B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b5fb808-85bb-11e8-b085-8db2ab303789′]

याबाबत मिळालेलीच अधिक माहिती अशी की, तिरुवनंतपूरम येथे शशी थरूर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, २०१९ मध्ये भाजपा लोकसभा इलेक्शन जिंकले तर, ते संविधानाची मोडतोड करतील, सध्या पाकिस्तानची जशी अवस्था आहे तशी भारताची अवस्था होईल, म्हणजेच भारत हिंदू पाकिस्तान बनेल, भाजपा पुन्हा सत्तेत आली तर लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होईल. संविधानात असलेले सर्व मूलभूत तत्वे काढून टाकण्यात येतील, याच बरोबर नव्या संविधान निर्मितीचे काम सुरु होईल. त्यामुळे तयार झालेले नवे राष्ट्र हे हिंदू राष्ट्रांच्या सिद्धांतावरच चालेल. भारत हिंदू पाकिस्तान बनेल आसा वादग्रस्त दावा त्यांनी केला.

इतकेच नव्हे तर शशी थरूर यांच्या अश्या वादग्रस्त  दाव्यावर भाजपनेहि पलटवार केला आहे .पाकिस्तानच्या निर्मितीला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. तसेच आपण आई मानणाऱ्या भारत देशाची तुलना पाकिस्तानशी केल्याने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वांची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B07CK74Y2W,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0c3b95b-85bb-11e8-8372-df753e8e29cb’]

इतक्यावरच भाजपा थांबली नाही तर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा  यांनी ट्विटरवरही या विषयी काँग्रेसवर पलटवार केला.  शशी थरूर यांच्या मते  भाजपा २०१९ मध्ये सत्तेत आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल,  काँग्रेस बेशरम आहे, भारताला कमीपणा दाखवण्यासाठी आणि हिंदू नागरिकांना बदनाम करण्यासाठी एकही संधी काँग्रेस सोडत नाही. हिंदू दहशतवादापासून , हिंदूं पाकिस्तान पर्यंत…..पाकिस्तानला खुश करण्याच्या कृतींना काँग्रेसला तोड नाही . असा पलटवार भाजपा प्रवक्ते संबित पत्रा यांनी ट्विटरद्वारे केला. आता शशी थरूर यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.