संयुक्त राष्ट्रात चीनला झटका, ECOSOC चा सदस्य बनला भारत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताने चीनवर मात करत आर्थिक आणि सामाजिक परिषदची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी ही माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती.

प्रतिष्ठीत‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्यत्व भारताने मिळवले आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमधील समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणअयासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे महत्त्वपूर्ण समर्थन देते.

आम्ही सदस्य देशांना समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया टीएस. तिरूमूर्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. भारत, अफगाणिस्तान आणि चीन या तीन देशांनी कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनसाठी निवडणूक लढवली होती. यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने 54 सदस्यांच्या मताद्वारे विजय मिळवला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. चीनला या प्रक्रियेत अर्धीदेखील मते मिळाली नाहीत.