‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीत शिरुन, मुजफ्फराबादच्या बालाकोट भागात १००० किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, भारताचे लढाऊ विमानही पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे.

१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारतातून सर्वत्र रोष व्यक्त होत होता.

त्यावर भारताने आक्रमक भूमिका घेत पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद च्या तळावर हल्ला केला. आणि त्याची तळे उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जैशच्या ३०० अतिरेक्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सॅटलाईट द्वारे या हल्ल्याचे चित्र जाहीर करण्यात आले आहे. या चित्रात जे बॉम्ब टाकण्यात आले त्या जागा दाखवण्यात आल्या आहेत. त्यात १० जागांवरील हल्ला स्पष्ट दिसत आहे.


 

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु