Air Force Day 2020 : भारतीय वायुसेनेची 11 पराक्रमं, ज्यात सेनेला विजय मिळाला होता

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली होती. म्हणून 8 ऑक्टोबर हा भारतीय वायुसेनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या भारतीय वायुसेनेत 1720 पेक्षा जास्त लढाऊ विमाने असून 1.70 लाख वैमानिक आहेत आहेत. आतापर्यंत भारतीय वायुसेनेने भरपूर पराक्रमे केली आहेत. चला तर मग वायुसेनेची आतापर्यंची मोठी 11 पराक्रम पाहूया.

1. दुसऱ्या महायुध्दात जपानला थायलंडमध्ये रोखून धरले –
भारतीय वायुसेनेने दुसऱ्या महायुध्दात जपानची सेना ब्रम्हदेशकडे येत असताना त्यांना थायलंडमध्येच रोखून धरले होते. अराकान, माए होंग सोन, चियांग माई आणि चियांग राई बेसवरून जपानी सैन्याला परतावले होते. या युध्दात भारतीय वायूसेना अमेरिकन आणि ब्रिटिश सेनेला मदत करत होती.

2. 1947 मध्ये फाळणीनंतर वायुसेनेचं कार्य –
देशाची फाळणी होऊन 1947 ला पाकिस्तान वेगळा झाला होता. त्यावेळी वायुसेनाही दोन देशांत वाटली गेली होती. त्यादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानची फूस असलेल्या खोऱ्यातील बंडखोरांनी आक्रमण केले होते. तेंव्हाही भारतीय वायूसेनेने या लोकांना माघारी परतावले होते.

3. 1960-61 काँगोत शांती स्थापन करण्यात आणि गोवा मुक्तीत योगदान –
1960 मध्ये काँगोमधून बेल्जीयमचं राज्य संपले होते. यानंतर संपुर्ण काँगोत मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत होता भारतीय वायूसेनेने तिथे शांतता ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्यातदरम्यान गोवा मुक्तीसंग्रामातही मोठी कामगिरी केली होती.

4. 1965 भारत-पाकिस्तान युध्द –
या युध्दात भारतीय सेनेने पाकिस्तान वायुसेनेला चितपट केले होते. पाकचे बरेच बेस उध्दवस्त केले होते. यात भारतीय वायूसेनेचंही नुकसान झाले होते पण आपल्या वायुसेनचं कार्य अतुलनीय होते.

5. 1971 चा बांग्लादेश मुक्तीसंग्राम –
बांग्लादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र करण्यात भारतीय वायूसनेचं कार्य महत्वपुर्ण होते. 93 हजार पाकिस्तानच्या सैन्याने यावेळेस आत्मसमर्पण केले होते. या मुक्तीसंग्रामात भारतीय वायुसेनेच्या विमांनांनी 12 हजार वेळेस उड्डाने केली होती. यावेळी भारताने पाकिस्तानची 94 विमाने पाडली होती.

6. ऑपरेशन मेघदूत –
भारतीय वायुसेनेने भूदलासोबत मिळून 13 एप्रिल 1984 साली सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूतअंतर्गत आक्रमण केले होते. यानंतर भारताच्या ताब्यात संपुर्ण सियाचीन ग्लेशियर आला होता. या ऑपरेशनखाली भारताने 3000 चौरस किमीचे क्षेत्रफळ जिंकले होते.

7. श्रीलंकेतील यादवी युध्द –
1987 साली श्रीलंकेत तामिळ बंडखोरांनी मोठं यादवी युध्द छेडले होते. यावेळे श्रीलंकन सरकारने भारताला मदत मागितली होती. त्यावेळी भारतीय वायुसेनेने ऑपरेशन पूमलाई केले होते. याच वर्षी ऑपरेशन पवनही सुरु केले होते. याकाळात भारतीय वायुसेनेने 70 हजांरापेक्षा जास्त उड्डाने केली होती.

8. मालदीवमध्ये शांतता स्थापण्यास मदत –
3 नोव्हेंबर 1988 साली भारतीय वायुसेनेने मालदीवला 4 मिराज फायटर जेट विमाने आणि आइएल-76 पाठविली होती. कारण त्यावेळेस मालदीवचे राष्ट्रपती गयूम यांनी भारताकडे मदत मागितली होती की, मालदीवमधील बंडखोर अशांतता पसरवत आहेत. त्यावेळेस भारतीय वायुसेनेने बंडखोरांचा फडशा पाडला होता. यामुळे याला ‘ऑपरेशन कॅक्टस’ असं नाव दिले होते.

9. कारगिल युध्द –
1999 साली भारतीय लष्कराने वायुसेनेला मदत मागितली होती. वायुसेनेने हेलिकॉप्टर आणि विमानांनी कारगीलमधील शिखरांवर हल्ला केला होता. संपुर्ण कारगील युध्दात भारतीय वायुसेनेच्या विमानांनी प्रत्येक दिवशी 40 उड्डाने केली होती. शेवटी 26 जुलैला भारतीय सेनेचा विजय झाला होता. यादरम्यान सैन्याने ऑपरेशन सफेद सागर राबवलं होते.

10. बालाकोट –
14 फेब्रूवारीला 2019 जैश-ए-मोहम्मद आतंकवादी संघटनेने पुलवामात आत्मघाती हल्ला केला होता. त्या हल्ल्यात CRPF चे 46 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 15 दिवसाच्या आतच भारतीय वायुसेनेने PoKत जाऊन बालाकोट, चकोठी, मुजफ्फराबादमध्ये मिराज-2000 फाइटर प्लेनने हल्ला केला होता.

11. अभिनंदनने मिग-21 विमानाने पाकिस्तानच्या एफ-16 पाडले –
27 फेब्रूवारी 2019 ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या एफ-16 आणि जेएफ-17 फायटर जेटला भारतीय सीमा पार करताना पाहिले होते. त्यानंतर तात्काळ भारतीय वायुसेनेने कारवाई केली होती. त्यात विंग कंमांडर अभिनंदन यांनी मिग-21 ने एफ-16 ला पाडले होते.