हवाई हल्ल्याचा मोदींना निवडणुकीत फायदा होणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज पाकिस्तानच्या हद्दीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्य तळावर बॉम्ब टाकून ३५० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर मोदींवर देशभर कौतुकाचा वर्षाव होत असताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या लष्कराच्या यशाचा मोदींना निवडणुकीत फायदा होणार नाही असे ट्विट केले आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विट मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा हवाला देत विधान केले आहे. १९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी परमाणू परीक्षण करून घेतले होते तरी हि त्यांना आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले होते म्हणून मोदींना देखील आगामी निवडणुकीत फारसा फायदा होणार नाही असे मत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान आज मोदींनी हवाई हल्ल्यानंतर राजस्थानमध्ये झालेल्या जाहीर सभेत देश योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. तसेच याच ठिकाणी मोदींनी केलेल्या भाषणात आगामी लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी स्पष्ट दिसून आली आहे. याच भाषणाच्या पार्श्वभूमीवर ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले असावे असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

#Surgicalstrike2 : ५० बातम्या एकाच क्लिक वर