लडाख सीमेवर चकमक झाल्यानंतर घाबरलेला चीन म्हणतो – ‘एकतरफा पाऊल उचलू नका’

बिजिंग : वृत्तसंस्था – लडाखमधील भारत चीन सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह दोन भारतीय जवान शहीद झाले आहे. मात्र, या चकमकीत चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तरं दिलं असून, चीनचे ही पाच जवान ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, चीनने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक पत्रक जारी करत, घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर चीन गंभीर असून, भारताला आवाहन करतो की, त्यांनी एकतरफा कारवाई सारखे पाऊल उचलू नये आणि हे प्रकरण अधिक वाढवू नये, असं म्हटलं आहे

लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण असून, सध्या दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु असल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलं. या आधी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सुरु आहे आणि लवकरात लवकर यावरती काहीतरी मार्ग निघेल. तर भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका अधिकृत पत्रात म्हटलं आहे की, ‘गलवान खोऱ्यात डि-एक्सलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोनच सैन्य समोरा-समोर आलं. त्यामध्ये एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत.

चीनचा भारतावर आरोप
भारताने एकतरफा पाऊल उचलू नये, असं सांगणारा चीन दुसरीकडे भारतीय लष्करच या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचं म्हणत आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने भारतावरती सीमा ओलांडून कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. चीनने आरोप करत म्हटलं आहे की, भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा हिंसाचार झाला. एवढेच नाही, तर भारताने आपल्या लष्कराला करारानुसार सीमा ओलांडण्यापासून रोखायला हवे. त्यामुळे अशा प्रकारच्या चकमकी पुन्हा उद्भवणार नाही, असे आवाहन देखील चीननं केलं आहे.

तर चीनचंच मोठं नुकसान…
भारत आणि चीन यांच्यामध्ये यापूर्वी १९६७ साली बरोबर ५३ वर्षाखाली झडप झाली होती. ही चकमक सिक्कीममध्ये उडाली होती. भारत आपल्या हद्दीमध्ये १९६२ च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. यामुळे चीन चिडला होता. १९६७ च्या या छोट्या युद्धामध्ये भारताचे ८० जवान तर चीनचे ४०० सैनिक ठार झाले होते.