इंडियन आयडॉल मधील ‘या’ गायकाने केला प्रेयसीचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

इंडियन आयडॉल या संगीताच्या कार्यक्रमात आपल्या गायन आणि बासरी वादनाने सर्वंना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकाने आपल्या प्रियसीचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर प्रियसीच्या शरीराचे तुकडे करुन ते एका पुलाजवळ फेकून दिल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये उघडकीस आली आहे. रिजवान खान असे आरोपी गायकाचे नाव आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6bcd6de8-c3d7-11e8-8c99-27b380825912′]

रिजवान खान हा गायन आणि बासरी वाजवायचा. त्याला संगीत क्षेत्रामध्ये आपले करीअर घडावयचे होते. तशी स्वप्नदेखील तो पाहत होता. त्यामुळे तो मिळेल ते छोटे मोठे गाण्याचा कार्यक्रम करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याचा हजरत निजामुद्दीन दर्ग्यामध्ये गायनाचा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमादरम्यान त्याची सायमा या तरुणीबरोबर ओळख झाली. सायमाला रिजवानचे गाणे आवडत होते. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर प्रेमात झाले. दोघांच्या या संबंधामुळे दोघेही खुप खुष होते. त्यातच रिजवान याची इंडियन आयडॉल या स्पर्धेसाठी निवड झाली. या बातमीने सायमा अत्यंत खुष होती. मात्र, रिजवान इंडीयन आयडॉलच्या अंतीम फेरीतून बाद झाल्याने सायमा त्याच्यावर नाराज झाली. त्यामुळे तिने रिजवानशी बोलणे बंद केले. दरम्यान, सायमाने दुसऱ्या तरुणाबरोबर मैत्री केल्याचे रिजवानला समजले. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाले.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’848f7825-c3d7-11e8-89a5-2953c273795d’]

त्यानंतर रविवारी रिजवानच्या भावाने समीरने भांडण संपवण्यासाठी सायमाला घरी बोलावले. सायमा रिजवानच्या घरी आली. पण तेव्हाही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात रिजवानने धारदार चाकूने तिचा गळा चिरला. नंतर समीरच्या मदतीने तिच्या शरीराचे तुकडे केले व ते मोठ्या बॅगेत भरले. त्यानंतर येथील बारापुला नदीजवळील पुलावर ही बॅग त्यांनी फेकली व पळ काढला. त्यानंतर दोन दिवसांनी रिजवान स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस समीरचा शोध घेत आहेत.

नाना पाटेकर देणार हर सवाल का जबाब लवकरच घेणार पत्रकार परिषद