IPL चा धमाका ‘या’ तारखेपासून ‘सुरु’ होणार, पहिला ‘सामना’ मुंबईत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलचा धमाका म्हणलं की षटकार आणि चौकाराची बरसात. हाच आयपीएलचा तेरावा हंगाम कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांना होती आणि चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. कारण आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना वानखेडे मैदानावर पार पडणार आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर आयपीएलच्या नव्या हंगामाचा शुभारंभ करणार आहेत.

परंतु आयपीएलच्या हंगामाला मार्चापासून सुरुवात होणार असल्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना फटका बसू शकतो. कारण याच दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी – 20 तर इंग्लंड – श्रीलंकामध्ये कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे या संघाचे काही खेळाडू सुरुवातीला काही सामन्यामंध्ये दिसणार नाहीत.

कोलकता संघासमोर मोठे आव्हान –

कोलकता आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यात सर्वात जास्त नुकसान सोसावे लागू शकते. कोलकता नाइट रायडर्सने लिलाव करताना पॅट कमिन्सवर विक्रमी 15.50 कोटींची बोली लावली होती. परंतु आयपीएलचे सामने मार्चमध्ये खेळवण्यात येणार असल्याने राष्ट्रीय संघांकडून खेळण्यात ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेचे खेळाडू व्यस्त असणार आहेत. त्यामुळे ते सुरुवातीच्या टप्प्यात खेळतील अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे फ्रँचायझींना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

फ्रँचायझींना 1 एप्रिलपासून स्पर्धा सुरु करायची आहे –

फ्रँचायझींना अपेक्षा होती की आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल जुन्या वेळापत्रकाप्रमाणे एप्रिलपासून इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या सत्राची सुरुवात करेल. कारण ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड टी – 20 मालिका 29 मार्च रोजी संपेल, तर इंग्लंड आणि श्रीलंकादरम्यान दुसरा कसोटी सामना 31 मार्चपर्यंत संपेल. परंतु अशी परिस्थिती आहे की आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धेत उतरणं संघांसाठी जिकरीचं ठरु शकतं. त्यामुळे फ्रँचायझींना वाटत आहे की 1 एप्रिलपासून आयपीएलची सुरुवात करावी.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/