रेल्वेची प्रवाशांसाठी खास ‘सुविधा’, आता वस्तू चोरी झाल्यास धावत्या रेल्वेत करा ‘FIR’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकार कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना दिलासा देणार आहे. ही बातमी रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या वस्तूंच्या सुरक्षेसंबंधित आहे. रेल्वेच्या या सुविधेमुळे चालत्या रेल्वेत तुम्ही चोरी आणि स्नॅचिंगच्या घटना घडताना दिसतात, त्यासंबंधित आता तुम्ही एफआयआर (FIR) दाखल करता येणार आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रवासी याचा फायदा घेऊ शकतात. जीआरपीने यासाठी एक खास अ‍ॅप सुरु केले आहे.

चालत्या रेल्वेत अनेकदा अशा घटना घटतात, जसे स्नॅचिंग होते, वस्तू चोरी होतात. खास करुन तेव्हा जेव्हा रेल्वे कमी वेगाने स्टेशन सोडत असते. अशा वेळी पीडित प्रवासी जोपर्यंत चेन ओढत नाही तो पर्यंत रेल्वे थांबत नाही आणि चोर तर पसार झालेला असतो. त्यानंतर स्टेशनवर तक्रार दाखल करावी लागते.

जीआरपीला प्रवाशांचे आणि त्यांचा सामनाची सुरक्षा करण्याचे मोठे क्षेत्र मिळाले आहे. यासाठीच जीआरपी सहयात्री नावाचे एक अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे अ‍ॅप 10 ऑक्टोबरला लॉन्च करण्यात येईल. या अ‍ॅपचा फायदा म्हणजे चालत्या रेल्वेत प्रवाशावर असा प्रसंग असल्यास ते रेल्वे न थांबवता मोबाइलवरुन एफआरआय दाखल करु शकतो. एवढेच नाही तर जीआरपी संबंधित आपले अनुभव देखील शेअर करु शकतो.

एफआयआर दाखल करण्यासाठी 2 तास थांबली रेल्वे
शान ए पंजाब एक्सप्रेस संबंधित एक घटना घडली होती, जसे की रेल्वे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन निघाली तसे एका प्रवाशाने रेल्वेची चेन खेचली. प्रवाशांची मागणी होती की पहिल्यांदा प्रवाशाच्या वस्तूच्या झालेल्या चोरीची तक्रार दाखल करण्यात यावी मगच रेल्वे रवाना होईल. या दरम्यान अनेकदा रेल्वे पुढे घेण्याचा प्रयत्न करण्यात आले परंतू प्रवासी पुन्हा एकदा रेल्वेची चैन खेचत होते. यामुळे रेल्वे 2 तास उशिरा रवाना करण्यात आली.

Visit : Policenama.com