रेल्वेचं तिकीट बुक करताना 49 पैशांमध्ये मिळणारी ‘ही’ सुविधा खरेदी करणं विसरू नका, संकटाच्या वेळी मिळेल लाखोंची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर रेल्वे आपल्या प्रवाशांची विशेष काळजी देखील घेत असते. सध्या दिवाळीच्या निमित्ताने रेल्वेने काही विशेष गाड्या सोडल्या असून बिहार आणि उत्तरप्रदेशसाठी 28 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे तुम्ही तिकीट बुक करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला या महत्वाच्या गोष्टीविषयी माहिती असायला हवी. रेल्वे तुम्हाला 50 पैशापेक्षा कमी रकमेत 10 लाख रुपयांपर्यंतचा प्रवासी विमा देत असते. याचा फायदा प्रवाशांबरोबरच त्याच्या कुटुंबियांना देखील होतो.

या पद्धतीने मिळावा प्रवासी विमा
IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. यासाठी तिकीट बुक करताना तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर पर्याय देखील मिळतो. यामध्ये 49 पैशात हा प्रवासी विमा तुम्हाला मिळतो. तुम्ही IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास तुम्हाला एक मॅसेज मिळतो. यानंतर तुम्ही ई-मेल वरून तुमच्या नॉमिनीविषयी माहिती भरून या विम्याचा लाभ घेऊ शकता.

कुणाला मिळणार फायदा
IRCTC च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या विम्याचा लाभ हा केवळ कन्फर्म आणि आरएसी तिकीट असणाऱ्यांचा मिळणार आहे. वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. तसेच पाच वर्षाच्या आतमधील मुलांना याचा फायदा मिळणार नाही.

तुम्हीं रेल्वेने प्रवास सुरु केल्यानंतर लगेच तुमच्या विम्याच्या मुदतीची देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास पूर्ण होईपर्यंत तुमचा हा विमा सुरु राहणार आहे. तसेच रेल्वेत चढताना किंवा उतरताना काही अपघात झाल्यास देखील तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. या प्रवासादरम्यान, तुम्हाला अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये भरपाई मिळणार असून मृत्यू झाल्यास देखील 10 लाख रुपयांची मदत मिळनार आहे. तसेच मृतदेह नेण्यास देखील १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

Visit  :Policenama.com