नववर्षात रेल्वेचं ‘महागडं’ गिफ्ट, 1 जानेवारी 2020 पासुन प्रवास भाड्यात ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात इंडियन रेल्वेने भाडेवाढ करुन प्रवाशांना झटका दिला आहे. रेल्वेची भाडेवाढ 1 जानेवारीपासून लागू होईल. दूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भाड्यात मोठी वाढ होणार आहे. रेल्वेकडून 4 पैसे प्रति किलोमीटरपर्यंत प्रवासी भाड्यात वाढ करण्यात येईल. रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस रेल्वेसाठी 2 पैसे प्रति किलोमीटर आणि एसी रेल्वेचे भाडे 4 पैसे प्रति किलोमीटर वाढवण्यात आले आहे.

किती असेल रेल्वेचे वाढलेले भाडे

ऑर्डिनरी नॉन एसीचे भाडे –
1. सेकेंड क्लास ऑर्डिनरी – 1 पैसे प्रति किलोमीटर
2. स्लीपर क्लास ऑर्डिनरी – 1 पैसा प्रति किलोमीटर
3. फर्स्ट क्लास ऑर्डिनरी – 1 पैसा प्रति किलोमीटर

मेल एक्सप्रेस नॉन एसीचे भाडे –
1. सेकेंड क्लास (मेल/ एक्सप्रेस) – 2 पैसे प्रति किलोमीटर
2. स्लीपर क्लास (मेल/ एक्सप्रेस) – 2 पैसे प्रति किलोमीटर
3. फर्स्ट क्लास (मेल/ एक्सप्रेस) – 2 पैसे प्रति किलोमीटर

एसी क्लासचे भाडे –
1. एसी चेअर कार – 4 पैसे प्रति किलोमीटर
2. एसी 3 – टियर / 3 ई – 4 पैसे प्रति किलोमीटर
3. एसी 2 – टियर – 4 पैसे प्रति किलोमीटर
4. एसी फस्ट क्लास इकॉनोमी क्लास/ ईए – 4 पैसे प्रति किलोमीटर

तर उपनगरीय (सब अर्बन) रेल्वे सेवा आणि सीजन तिकिटच्या भाड्यात काहीही बदल केले गेले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/