#ChallengeAccepted, विराट कोहली आणि मिताली राज खेळणार एकाच संघातून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेटमधील हे महिला व पुरुष संघाचे आघाडीचे कर्णधार विराट कोहली आणि मिताली राज एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. #ChallengeAccepted या मोहीमेअंतर्गत प्रथमच महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश असलेल्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यात मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमुर्ती या महिला क्रिकेटपटूंसह विराट कोहली एक संदेश देत आहेत. त्यात आगामी काळात महिला व पुरुष एकाच संघातून एकत्र खेळताना दिसतील असे सांगण्यात आले आहे.

#ChallengeAccepted या मोहिमेला पाठिंबा देताना मिताली राज म्हणाली की, मागील काही वर्षांत महिला क्रिकेटमध्ये बरीच प्रगती झालेली आहे. पण, मैदानावर अजूनही असमानता दिसत आहे. खेळपट्टीचा आकार, संधी, पगार, प्रक्षेपण आणि चाहत्यांचा पाठींबा यात महिला क्रिकेटला अजूनही दुय्यम स्थान मिळत आहे. त्यामुळे या मोहीमेला मी पाठींबा देत आहे.”

तर विराट कोहली म्हणाला की, ‘विराट कोहली म्हणाला, ‘क्रिकेट हा असा खेळ आहे की येथे स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव होत नाही. त्यामुळे सर्वांना समान वागणुक मिळणे आवश्यक आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे महत्त्वाचे आहे.’