मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आज प्रत्युत्तर देत कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईबद्दल शिवसेनेनं वायुसेनेचे कौतुक केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘आपण घरात घुसून मारलं आहे. आपल्या सेनेचा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. अखेर आज भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळावर १ हजार किलोचा बॉम्ब फेकला. या हल्ल्यामुळे दशतवाद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारताच्या हवाई दलातील मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.

भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला आहे. भारताकडून ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारीला हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केलेल्या या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. आज पहाटे केलेलेल्या कारवाईचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरातून कौतुक होत.