इंडिगो विमानाचे पुण्यात ईंमर्जन्सी लँडिंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातून नागपूरच्या दिशेने निघालेल्या इंडिगो या कंपनीच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन हे सावधगिरीचे संदेश देत असल्याने पायलटने त्यासंदर्भात विमाळतळाशी संपर्क साधून विमानाचे परत पुणे विमाणतळावर तात्काळ लॅंडींग करण्यात आले. त्यासंदर्भातील एक ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो A320 NEO या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलटला इंजिनमधून सावधगिरीचा संदेश मिळाला. त्यामुळे पुर्वदक्षता म्हणून विमानाचे पुन्हा पुणे विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान पुण्यातून नागपूरला जात होते. तांत्रिक संघाची टीम विमानाचे परीक्षण करीत आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आले आहे.