Coronavirus : संकटामध्ये अमेरिकेत भारतीय मुलीनं फुलवलं अनेकांच्या चहर्‍यावर हास्य, सर्वच स्तरातून ‘कौतुक’

दिल्ली , पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या १५ वर्षीय मुलीने अमेरिकेतील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले आहे. कोरोनाचा सार्वधिक फटका जर कोणत्या देशाला बसला असेल तो देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेत कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत ४९ हजारांवर बळी घेतले आहे. या परिस्थितीमुळे अमेरिकन नागरिक हतबल झाले आहेत. हि परिस्थिती निवळण्यासाठी हिता गुप्ता या मुलीने खारीचा वाटा उचलला आहे. हिता देखील लॉकडाऊन मुळे घरातच आहे. हिता हि नर्सिंग होम मध्ये असणाऱ्या वृद्धांना तसेच लहान मुलांना गिफ्ट आणि मनाला प्रेरणा , उभारी देणारी पत्रे पाठवून त्यांच्या चेहऱ्यांवर हसू उमटवत आहे. हिता हि तिच्या हाताने लिहिलेली पत्र. त्यासोबत गिफ्ट्स मध्ये कथांची पुस्तकं, रंगाच्या पेन्सिल पाठवते.

हिता गुप्ता ब्राइटनिंग अ डे नावाची एनजीओ चालवते. अमेरिकेतील सात राज्यांमध्ये असलेल्या ५० रुग्णालयात आणि नर्सिंग होममधील २७०० मुलांपर्यंत हीताची एजन्सी पोहोचली आहे. हीताने फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातील अनाथालयांमध्ये शालोपयोगी साहित्या आणि कार्ड पाठवली आहेत

पीटीआयशी बोलताना हिता म्हणाली , मला हा विचार करून दु:ख होतं की अनेक नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या लोकांना किती एकटं आणि तणावपूर्म वाटत असेल. आपल्या जवळच्या लोकांना भेटता येत नाही. वृद्ध लोक आधीपासूनच एकटे आहेत. एका अभ्यासात अशी गोष्ट समोर आली की ४० टक्के वृद्धांना एकटेपणा जाणवतो. कोरोनाच्या संकटकाळात एकट्या पडलेल्या जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावऱण तयार झालं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की ते एकटे नाहीत हे सांगण्याची. मी यासाठी स्वत:च्या पैशातून गिफ्ट पाठवायला सुरुवात केली. आतापर्यंत १६ स्थानिक नर्सिंग होममध्ये राहणाऱ्यांसाठी गिफ्ट पाठवली असल्याचंही हीताने सांगितलं अमेरिकन दूतावासाने त्यांच्या फेसबूक पेजवर म्हटलं की, काही प्रेरणा हवी आहे का? अमेरिकेत पेन्सिलवेनियातील १५ वर्षीय हीता गुप्ता गिफ्ट आणि पत्रातून नर्सिंग होममध्ये राहणाऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत आहे. अशाप्रकारे अमेरिकन दूतवासाने देखील हिताचे कौतुक केले.

हिताच्या या कामगिरीची जगभरात दखल घेतली जात आहे. तसेच तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.