आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – Indrayani River Alandi | कार्तिकी यात्रा (Kartiki Yatra) अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. त्यातच इंद्रायणी नदीतील जलप्रदुषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी (Indrayani River Alandi) रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस आला आहे. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC)हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. याचा परिणाम इंद्रायणी नदीचे पात्र रसायुक्त साडपाण्याने फेसाळले आहे.
इंद्रायणी नदीत (Indrayani River Alandi) रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहेत. तसेच नदीमधील पाणी शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिल्याने पिकांवर दूरोगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. याकडे प्रशासन लक्ष घालणार का असा सवाल स्थानिकांसह वारकऱ्यांकडून केला जात आहे.
आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या 5 डिसेंबर पासून माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी यात्रा आहे.
या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार आहेत. सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहेत.
विशेषत: अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात.
मात्र, सध्याच्या स्थितीत इंद्रायणी नदीमधील पाणी पिण्यास किंवा भाविकाना स्नान करण्यास योग्य नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा