पोलिस अधिकारी महिलेला म्हणाला – ब्लाऊज फाडून आल्यानंतर लिहून घेतो बलात्काराचा गुन्हा (व्हिडीओ)

कानपुर : वृत्तसंस्था – कानपूरमधील नर्वल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेशी एसओने अश्लील पद्धतीने बोलले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. व्हिडिओमध्ये नर्वल निरीक्षक दिसत नाहीत, परंतु आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. पोलिस स्टेशनही दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत डीआयजीने एसओकडे चौकशी केली.

एक महिला एसओ रामऔतारकडे जमीन ताब्यात घेतल्याची तक्रार करताना ऐकू येत आहे. दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात हजर आहेत. याच दरम्यान महिलेच्या तक्रारीवरून एसओ आरोपीला फटकारत असल्याचे ऐकू येत आहे. संभाषणातच एसओ महिलेला म्हणत आहे की, या वेळी आला तर ब्लाउज फाडून या. मग बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करेन. एसओ आरोपीला शिवीगाळ करत अभद्र भाषा वापरत आहेत. कुणीतरी घटनेचा संपूर्ण व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. प्रकरणाची माहिती मिळताच डीआयजी प्रीतिंदर सिंह यांनी रामऔतारला हजर करून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

 

 

यापूर्वीही वादात सापडले आहेत नर्वल एसओ
नर्वल एसओ रामऔतार यापूर्वीही वादात सापडले आहेत. पण त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. ते दोन वर्षांपासून पोलिस ठाण्यात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकरी त्यांच्या अश्लिलतेमुळे त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजप नेत्याचा भाऊ जालीमपुरवा गावात राहणाऱ्या नीरज पालला ठाण्यात बोलावून मारहाण केली होती. भाजपने या प्रकरणात तत्कालीन डीआयजी अनंत देव यांच्याकडे तक्रारही केली होती. पण कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. याशिवाय कुडी गावचे रहिवासी संदीप यादव यांच्याशीही अश्लीलता केली होती.