तातडीने होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब दोन्ही लोकशाहीसाठी घातक : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यायदानास होणारा विलंब लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र, त्यामुळे तातडीने दिल्या जाणाऱ्या न्यायाचं समर्थन करता येणार नाही. देशात सर्वकाही घटनेनुसार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हैदराबाद घटनेबाबत बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले, हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर बलात्कारासारख्या गुन्ह्यात तातडीनं न्याय देण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नायडूंनी केलेले हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहातमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक आठ खासदारांना संसदीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी सर्वोत्कृष्ट खासदार (राज्यसभा) पुरस्कार द्रमुकच्या तिरुची शिवा यांना प्रदान करण्यात आला. लोकसभेतील सर्वोत्तम खासदार सौगत रॉय, लोकसभेतील सर्वोत्कृष्ट महिला खासदार सुप्रिया सुळे, सर्वोत्कृष्ट राज्यसभा खासदार विप्लव ठाकूर, सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार राज्यसभा कहकशां परवीन, लोकसभेतील सर्वोत्कृष्ट महिला खासदार डॉ. भारती पवार तर लोकसभेतील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून मुलायम सिंह यांना देण्यात आला.

Visit : Policenama.com