Insurance Policy | केवळ टॅक्स वाचवण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करताय, व्हा सतर्क अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा काही लोक केवळ टॅक्स (Tax) वाचवण्यासाठी विमा पॉलिसी (Insurance Policy) खरेदी करतात. ‘जर तुम्ही विमा पॉलिसी घेतली तर टॅक्समध्ये मोठी बचत होईल’, असं विमा एजंट (Insurance Agent) सांगतो. यावर लोक विश्वास ठेवतात आणि विमा पॉलिसी (Insurance Policy) खरेदी करतात. मात्र, असं बोलून विमा एजंट तुमची एकप्रकारे फसवणूक (Cheating) करण्याचा प्रयत्न करु शकतात. जेणेकरून तुम्ही त्याच्याकडून पॉलिसी घ्यावी. तुम्हालाही एखाद्या एजंटने असे सांगितले असेल तर पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी एकदा विचार करा आणि पॉलिसी घ्या. पॉलिसी घेण्याची घाई करु नका.

 

इन्कम टॅक्स (Income Tax) सेक्शन 80C अंतर्गत, जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियम वर (Life Insurance Policy Premium) वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंत सूट मिळते. याचीच मदत घेऊन विमा एजंट तुमच्यावर प्रीमियमचा बोजा लादतात. त्यामुळे तुम्ही सतर्क असले पाहिजे आणि टॅक्स वाचवण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घेतला पाहिजे. कारण विमा पॉलिसी शिवाय (Insurance Policy) असे अनेक गुंतवणुकीचे (Investment) पर्याय आहेत, जे तुम्हाला विमा पॉलिसी पेक्षा जास्त परतावा देतात. विमा पॉलिसीची किंमत (Policy Price) देखील जास्त आहे. त्यामुळे त्याचा परतावा 4-5 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे.

जानेवारी ते मार्चमध्ये सर्वाधिक दबाव
जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये विमा कंपन्या आपल्या विमा एजंटवर जास्त पॉलिसी काढण्याचा दबाव टाकतात. करदातेही गुंतवणूक करण्याच्या घाईत विमा पॉलिसी घेतात. अनेकवेळा तर त्यांना गरज नसताना देखील ते पॉलिसी खरेदी करतात. विमा पॉलिसी तुमची जोखीम कव्हर करण्यासाठी आहे. याकडे करबचतीचा पर्याय म्हणून पाहू नका असं BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी (CEO Adil Shetty) यांनी सांगितले.

 

गुंतवणुकीचे अनेक पर्याय
सरकारने ऑफर केलेल्या अनेक बचत योजना विमा पॉलिसीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा अधिक परतावा देतात.
यामध्ये तुम्हाला 80 C अंतर्गत टॅक्समध्ये सूट मिळते.
यामध्ये लोकप्रिय योजना सुकन्या समृद्धी योजनेवर (Sukanya Samriddhi Yojana) 7.6 टक्के सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (Public Provident Fund) 7.1 टक्के आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (National Savings Certificate) 6.8 टक्के परतावा दिला जातो.
तसेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (Equity Linked Savings Scheme) सारख्या म्युच्युअल फंड (Mutual Funds) योजनांवर देखील 1.5 लाखांची कर सूट मिळते आणि 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो.

 

त्यामुळे विमा एजंट तुम्हाला कर वाचवण्यासाठी विमा पॉलिसी घेण्यास सांगत असेल तर ती घेण्यापूर्वी इतर पर्यायांचा आधी विचार करा.
कारण इतर पर्यायांमधून तुम्हाला विमा पॉलिसीपेक्षा जास्त चांगले परतावे मिळतील, तसेच तुमची बचत देखील होईल.

 

Web Title :- Insurance Policy | buying life insurance policy just to save tax is not good

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा