‘या’ अभिनेत्याच्या मुलासह डेब्यू करण्यास खुशी इच्छुक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जेव्हा हिरोईन सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळी छाप निर्माण करतात. आणि शेवट पर्यंत टिकून राहतात. तशीच इच्छा त्यांच्या मुलां-मुलींची देखिल आहे. असे खुप नवीन चेहरे ज्यांचे आई-वडील चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांची मुले आज ही चित्रपट सृष्टीमध्ये प्रसिद्ध आहे. अशीच एक सुप्रसिद्ध हिरोईन श्रीदेवी तिची मुलगी जान्हवी कपुर ने चित्रपट सृष्टीत पर्दापण करुन वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा धडक सिनेमा या चित्रपटातून सुरुवात केली.


श्रीदेवी ची लहान मुलगी खुशी कपुर ही मोठया पडद्यावर आपली अदाकारी दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या डेब्यू करण्याआधीच तिच्या चाहत्यांना वेड लागले आहे. खुशी बॉलिवुडमध्ये ‘बादशहा’ चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करणार असल्याची चर्चा खुप प्रसिद्ध होत आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांनी अनेक नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन आणि खुशी एकत्र झळकणार आल्याचे समजले होते. पण नेहाच्या ‘बीएफएफ्स विद वोग सीजन ३’ कार्यक्रमात खुशी व जान्हवी उपस्थित होते. तेव्हा खुशीने हा खुलासा केला.

नेहाचे जेव्हा खुशीला प्रश्न विचारला की, तुला बॉलिवुड मध्ये कोणासोबत डेब्यू करायला आवडेल तेव्हा ती म्हणाली, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, चंकी पांडेचा भाचा अहान पांडे, आणि जावेद जाफीरचा मुलगा मजान जाफीरी यांच्या सोबत काम करण्यास प्राधान्य दिले. पण चंकी पांडे यांचा भाचा अहान पांडे याची निवड केली. जर वडिलांना मान्य नसेल कर मी त्यांना समजावून सांगेल. व त्यांना तयार करेल, असे खुशी ने म्हटले.