शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी 18 सप्टेंबरचा मुहूर्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या होत्या. मात्र शिवसेनेच्या मुलाखती कधी हाच प्रश्न सर्वांना पडला होता. कारण या वेळेस शिवसेनेकडून अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनेमध्ये माजी आमदार अनिल राठोड यांच्या व्यतिरिक्त कोणीही उमेदवार निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करत नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि अनील राठोड हे समीकरण निवडणुकीसाठी बनून गेले होते.

यावेळेस मात्र चित्र उलटे असून शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक इच्छुक आहेत. माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह माजी महापौर शीला ताई शिंदे यांचे पती नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम यांचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम तसेच नुकतेच शिवसेनेत आलेले नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह अजून दोन नगरसेवक विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळेस शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच दिसून येते.

येत्या 18 सप्टेंबर रोजी या सर्वांच्या मुलाखती थेट मातोश्रीवर होणार असून तेथूनच उमेदवाराची घोषणा केली जाईल. त्यामुळे यावेळेस उमेदवारी कोणाला भेटेल यावर कार्यकर्त्यांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

Loading...
You might also like