जगाला ‘Cut-Copy-Paste’ चं ‘जुगाड’ करून देणार्‍या संशोधकाचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कट, कॉपी आणि पेस्ट’ ही एक अशी टर्म आहे, ज्याशिवाय संगणक किंवा सोशल मीडियावर काम करणे अवघड आहे. ज्यांनी या कट, कॉपी पेस्टचा शोध लावला ते स्टीव्ह जॉब्स इतके लोकप्रिय नसतील परंतु त्यांचे योगदान महत्वाचे आहे. कट, कॉपी आणि पेस्ट यूजर इंटरफेस म्हणजेच यूआय प्रत्यक्षात एका संशोधकाने तयार केले होते. लॅरी टेस्लर असे या वैज्ञानिकांचे नाव असून त्यांचा मृत्यू झाला आहे.

74 वर्षीय लॅरी टेस्लर यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक विज्ञानाचे शिक्षण घेतले. 1973 मध्ये त्यांनी Xerox Palo Alto Research Center (PARC) जॉईन केले. इथूनच कट, कॉपी आणि पेस्टला सुरुवात झाली आहे. टेस्लर यांनी PARC टीम मॉटसोबत मिळून जिप्सी टेक्स्ट एडिटर तयार केले. यातच त्यांनी टेक्स्टला कॉपी आणि मूव्ह करण्यासाठी मोडलेस मेथड तयार केले. ज्यातून कट, कॉपी आणि पेस्टचा शोध लागला.

लॅरी टेस्लर आपल्या सीव्हीमध्ये लिहितात की, ते मॉडेलेस एडिटिंग आणि कट कॉपी पेस्टचे सुरुवातीचे शोधक आहे. दरम्यान त्यांनी सीव्हीमध्ये असेही लिहिले की, त्यांना चुकून ‘फादर ऑफ ग्राफिकल यूजर इंटफेस फॉर मैकिनतॉश’ म्हटले गेले, परंतु ते नाहीत. लॅरी टेस्लरने PARC मध्ये कट, कॉपी आणि पेस्ट विकसित केले. दरम्यान, नंतर संगणक इंटरफेस आणि टेक्स्ट एडिटिंगसाठी कट, कॉपी आणि पेस्टची ही संकल्पना आली.

दरम्यान, लॅरी ज्या PARC कंपनीत काम करत असे त्यांना सुरुवातीचे ग्राफिकल यूजर इंटरफेस व माऊस नेव्हिगेशनचे क्रेडिट मिळते. महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्सनेही अ‍ॅपलची उत्पादने सुधारण्यासाठी PARC च्या या संशोधनाचा वापर केला. असे म्हटले जाते की स्टीव्ह जॉब्स जेव्हा Xerox येथे आले होते, तेव्हा त्याच संघात लॅरी टेस्लर देखील उपस्थित होते. PARC व्यतिरिक्त, लॅरी टेस्लरने अ‍ॅमेझॉन आणि याहूबरोबर देखील काम केले आहे.