तुम्ही सॅलरीला हात नाही लावणार, अवलंबा गुंतवणुकीचा ‘हा’ फंडा, होईल मोठी कमाई !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरदार लोकांसाठी बचत हिच भविष्याची सोबती असते. विशेषत: प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी बचतीचा मार्ग खुप जरूरी आहे. आज आम्ही सांगणार आहोत की, एक नोकरदार व्यक्ती कशाप्रकारे यशस्वी गुंतवणुकदार बनू शकतो आणि सॅलरीपेक्षा जास्त गुंतवणुकीतून कमाई करता येऊ शकते.

एका गुंतवणुकदारासाठी व्याज नेहमी मुळ रक्कमेपेक्षा जास्त आवडीचे असते. कारण पैशातून पैसे बनवण्यात व्याजाची भूमिका जास्त मोठी असते. परंतु, व्याज तेव्हा मिळेल जेव्हा गुंतवणूक होईल, आणि गुंतवणुकीसाठी बचत जरूरी आहे.

नोकरदार लोकांची कमाई हळुहळु वाढते. अशावेळी उत्पन्न आणि खर्चामध्ये ताळमेळ बसवण्यात अडचणी येतात. परंतु त्याच सॅलरीमधून एक संतुलित रक्कम प्रत्येक महिन्याला वेगळी केली तर काही काळानंतर ती मोठी रक्कम बनते.

उदाहरणार्थ 25 हजार रुपये पगार घेणार्‍या व्यक्तीला दर महिना 10 हजार रुपयांची बचत करणे अवघड आहे, परंतु प्रत्येक महिन्याला खर्चातून थोडी कपात करून 10 टक्के रक्कम तो वाचवू शकतो, म्हणजे दर महिन्याला 2500 रुपयांची बचत होईल.

या रक्कमेला गुंतवणुकीसाठी केवळ योग्य फंड निवडण्याची गरज असेल. हे पैसे दर महिन्याला म्यूच्युअल फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) लावले जाऊ शकतात, जेथे चांगले रिटर्न मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, कुठेही गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

प्रत्येक महिन्याला सीपमध्ये 2500 रुपये लावण्याने पाच वर्षानंतर ही रक्कम 15 टक्के रिटर्नच्या हिशेबाने सुद्धा सुमारे 2 लाख रूपये होईल. या दरम्यान प्रत्येक वर्षाला गुंतवणुकदाराची सॅलरीसुद्धा वाढत जाईल. अशावेळी पाच वर्षानंतर गुंतवणुकदाराकडे एकरक्कमी 2 लाख रूपये असतील. जर गुंतवणुकदार पुढील तीन वर्षापर्यंत अशाच प्रकारे फंडमध्ये गुंतवणुक करत राहिला तर 8 वर्षानंतर जमा रक्कम वाढून 4 लाख रुपये होईल.

सामन्यपणे नोकरदार लोकांची सॅलरी सुमारे 8 वर्षात दुप्पट होते. जर त्यांच्या सॅलरीत 10 टक्के वार्षिकच्या हिशेबाने वाढ झाली तर या आधारावर 25 हजार रुपये महिनावाल्याची सॅलरी 10 वर्षात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त होईल. तर अवघी अडीच हजार दरमहिना गुंतवणूक याच कालावधीत वाढून 6 लाख रुपयेपर्यंत होईल.

इतकेच नव्हे, या 10 वर्षाच्या दरम्यान गुंतवणुकदार सॅलरीमध्ये वाढीतून वाचवलेली रक्कम दुसर्‍या ठिकाणी गुंतवू शकतो. जसे की शेयर बाजार, पीपीएफ आणि शॉर्ट टर्म फंडमध्ये. याशिवाय जेव्हा गुतवणुकदार याच वेगाने जर 20 वर्षापर्यंत म्यूच्युअल फंडसह दुसर्‍या ठिकाणी गुंतवणूक करत राहिला तर रक्कम इतकी मोठी होईल की, तो सॅलरीच्या बरोबरीने गुंतवणुकीतून कमाई करू लागेल.