६ पराभवानंतर ७ वा विजय मिळवूनही विराटला झटका, ‘या’ कारणासाठी झाला दंड

माहोली : वृत्तसंस्था – देशात लोकसभांसोबत आयपीएलवर सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक समान्यावर आणि खेळाडूंवर चाहत्यांचे लक्ष आहे. यंदा आयपीएलमध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा कर्णधार बंगळुरुच्या नेतृत्व करताना कमी पडत आहे का असं वाटत आहे. कारण सलग ६ सामन्यात बंगळुरुच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र अखेर बंगळुरुला पंजाबच्या संघावर मात करण्यात यश आले आहे. ६ सामन्यानंतर ७ वा सामना जिंकल्यावर कौतुक होण्या ऐवजी कर्णधार विराट कोहली हा ट्रोल होत आहे. तसंच त्याला एक झटकाही बसला आहे.

या सामन्यात पंजाबने १७४ धावांते आव्हान बंगळुरुसमोर ठेवले होते. हे आव्हान बंगळुरुने ८ गडी राखून विजय मिळवला. तसंच विराटने या सामन्यात ६७ धावाही केल्या. तर एबी डीव्हीलियर्सने नॉटआऊट ५९ धावा केल्या.

सामना जिंकूनही विराटला १२ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. याबाबत आयपीएलने अधिकृत वक्तव्य केले आहे. स्लो ओव्हर रेटसाठी असलेल्या आयपीएल आचार संहितेनुसार बंगळुरूच्या टीमचा हा पहिला अपराध होता. यासाठी कोहलीवर १२ लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचे आयपीएलने सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यावरही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.