विराटचा असा चाहता ; फलंदाजीदरम्यान सुरक्षाकड मोडत घेतली गळाभेट

माहोली : वृत्तसंस्था – भारतात आयपीएलच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीए. तसंच खेळाडूंच्या चाहत्यांबद्दल तर काही सांगायलाच नको. मागे काही दिवसांपूर्वी कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षाकड मोडत मैदानात पोहचला आणि माहीची भेट घेतली होती. त्यानंतर आता विराटच्या चाहत्याने फलंदाजीदरम्यान मैदानात य़ेऊन विराटची गळाभेट घेतली.

विराटची फलंदाजी सुरु असताना एका चाहत्याने सुरक्षाकडं मोडत थेट मैदानावर धाव घेतली. तेव्हा त्याला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकही त्याच्या मागे धावले. त्या चाहत्याने विराटजवळ येऊन त्याला मिठी मारली. विराटनेही शांततेत मिठी मारली आणि चाहत्याला पकडण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षकांना त्याला शांततेत घेऊन जाण्यासाठी सांगितलं, आणि प्रसंग निभावून नेला.

चाहत्याच्या या भेटीचा संघाला जणू फायदाच झाल्यासारखे झाले. सलग ६ पराभव स्वीकारल्यानंतर ७वा सामना बंगळूरू संघाने जिंकला.

किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयासाठी १७४ धावाचे आव्हान ठेवले होते. त्यावर बंगळूरूने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. महत्त्वाचे म्हणजे हा सामना जिंकणे बंगळुरुसाठी महत्त्वाचे होते.

Loading...
You might also like