…म्हणून अंपायर पाठकवर नेटकरी फिदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल म्हणलं की सोशल मीडियावर एखादी घटना, एखाद्या खेळाडूची कामगिरी हा नेहमी नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय होतो. परंतू हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात पहिल्यांदाच अंपायर पश्चिम पाठक नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

अबु धाबीच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामन्याला सुरुवात झाली. हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजचा निर्णय घेतला. अंपायर पश्चिम पाठक आणि एस. रवी यांनी मैदानावर पाऊल टाकल. पाठक यांचे वाढलेले केस पाहून सोशल मिडियावर अनेकांना या सामन्यात एखादी महिला अंपायर आल्यासारखे वाटल. परंतु खऱी गोष्ट समोर आल्यानंतर सोशल मिडियावर नेटक-यांनी पाठक यांची हेअरस्टाईल, त्यांची अंपायरींग करतांना उभे राहण्याची पध्दत यावर मिम्स तयार करायला सुरुवात केली.

2014 मध्ये पाठक यांनी पहिल्यांदा आयपीएल सामन्यामध्ये पंच म्हणून कामगिरी केली. आतापयर्यंत त्यांनी 8 सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. 2012 मध्ये पाठक यांनी महिला संघाच्या दोन वन-डे सामन्याच पंच म्हणून काम केले आहे. 2009 पासून पाठक भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहत आहेत.